Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

 
प. पू. श्री. देवेंद्रनाथ महाराज उर्फ श्री विजयकुमार सखाराम सुळे हे या कलियुगातील एक महान नाथपंथी सिध्‍द योगी होते. साधी रहाणी व उच्च विचारसरणी असलेले देवेंद्रनाथ महाराज हे व्यवसायाने वास्तूविशारद होते.

नाथ कार्य
नवध्यान योग
नवनाथ पोथीचे पारायण
गुरूमंत्र

 

श्री नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्ट (अहमदनगर र. नं. एफ्‌ १०७) या संस्थेने ‘मढी (जिल्हा - अहमदनगर, तालुका - पाथर्डी) येथे चैतन्य सद्‌गुरू श्री देवेंद्रनाथांचे समाधी मंदिर बांधले आहे. ३ नोव्हेंबर १९९६ रोजी नेपाळचे राजगुरू योगी श्री नरहरीनाथजी यांचे शुभहस्ते समाधीस्थानावर सद्‌गुरूमाऊलीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्‍ठा संपन्न झाली. मंदिर शिवपिंडीच्या आकाराचे असून अतिशय सुंदर असे झाले आहे.

  उद्देश:

प. पू. सद्‍गुरू श्री देवेंद्रनाथ महाराज हे सदरहू संस्थेचे संस्थेचे संस्थापक असून नाथ सांप्रदायाचा शास्त्रशुध्‍द अभ्यास करणे, नवनाथांच्या व नाथसिध्‍दांच्या समाधीस्थानांची माहिती मिळवणे, त्या स्थानांचा जीर्णोध्‍दार करणे, त्याठिकाणी भक्‍तांसाठी आवश्यक त्या सोयी उपलब्ध करणे, नाथ सांप्रदायाचे सिध्‍द साहित्य प्रसिध्‍द करणे, नाथांचा भक्‍तीमार्ग, योगमार्ग यांची भाविकांना व योगसाधकांना माहिती देणे, योगिक शिबिरे घेणे इत्यादी संस्‍थेचे विविध उद्देश आहेत.

  कार्य:

श्री नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्ट या संस्थेने अनेक सामाजिक कार्ये केली आहेत व अद्दापही सामाजिक कार्यांमध्ये कार्यरत आहे. श्रीक्षेत्र मढी, ता. पाथर्डी या ठिकाणी चैतन्य कनिफनाथांची समाधी असून तेथे रस्ते, वीज, पिण्याचे पाणी इत्यादी कामे केली. प्रत्येक महिन्याच्या दर्श अमावस्येला सद्‌गुरू श्री देवेंद्रनाथ महाराज समाधी स्थानासमोर हवनकुंडावर नाथपंथी होमहवन करून दीक्षांतनाथ जीव-ब्रम्ह सेवा करत असतात. पीठाधीपती खगेंद्रनाथ महाराज संतान प्राप्तीसाठी ओटी भरणे, गुरूमंत्र देणे इत्यादी कामे करत असून आलेल्या भक्‍तांना सत्‌संगामधून अत्यंत मोलाचे असे आध्यात्मिक मार्गदर्शन करत असतात. त्यामध्ये पुराणातील दाखले व वर्तमान काळातील येणारे अनुभव कथन करून भक्‍तांच्या शंकांचे निरसन करतात. जीव-ब्रम्ह सेवेतून दीक्षांतनाथ वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांनी पिडलेल्या लोकांसाठी/भक्‍तांसाठी मानसिक व्याधी, आर्थिक, कौटुंबिक, शारिरीक व्याधींनी पिडलेल्यांना नाथांचे भस्म मंत्रून देवून व्याधीमुक्‍त करतात. असंख्य भक्‍त त्याचा लाभ घेतात. अनेक भक्‍त व्याधीमुक्‍त झालेले आहेत.

  अलख निरंजन:

 

प.पू. श्री देवेंन्द्रनाथांनी आध्यात्मिक क्षेत्रात जी अनुभूती घेतली, त्यांना जे सिद्‍ध ज्ञान झाले, साक्षात देवदेवतांच्या सहवासात सिद्‍धांच्या सत्संगामध्ये त्यांना जे दिव्य ज्ञान प्राप्त झाले, ते सिद्‍ध ज्ञान, ते अनुभूती ते दैवी अमृत ‘अलख निरंजन’ या दिपावली अंकातून त्यांनी साधकांसाठी, भाविकांसाठी, मुमुक्षंसाठी देण्‍यास सुरूवात केली. ते सिद्‍ध लिखाण म्हणजे ईश्‍वरीवाणी, अमृतवाणी, श्री देवेंन्द्र्नाथांना आलेली दिव्य अनुभूती होत.

 

अशा प्रकारे अनेक आध्यात्मिक विषयांवर सविस्तर लेख लिहून श्री देवेन्द्रनाथांनी जिज्ञासूंना ज्ञानयोग दिला त्यामधूनच सर्वसमावेशकता दिसून येत

 

  कार्याची प्रगती:

श्री देवेंद्रनाथ आश्रम मढी (पाथर्डी) येथे नियोजनाप्रमाणे ह्यामध्ये बांधकामाचे काम पूर्ण झालेले असून विशेषत: ८०’ ४०’ हॉल, पाण्याची टाकी, भक्‍त निवास, भटारखाना, बाथरूम, टॉयलेट तसेच पीठाधीपतीसाठी स्वतंत्र रूम दीक्षांत नाथांसाठी विश्‍वस्तांसाठी स्वतंत्र रूम व व्ही. आय. पी. रूम इत्यादी कामे पूर्ण झालेली असून या कामासाठी एकूण बांधकाम खर्च रू. ६५ (पासष्‍ठ) लाख झालेला आहे.

सद्‍गुरू श्री देवेंद्रनाथांच्या समाधीच्या पायथ्याशी असलेली ३ हेक्‍टर २० आर जमीन संस्थेने खरेदी केली असून त्यामध्ये गोशाळा, वृध्‍दाश्रम, वनौषधी वृक्षांची लागवड, बगीचा इत्यादींसाठी सदर जमिनीचा वापर केला जाणार आहे.

  संस्थेचे विश्‍वस्त मंडळ:


क्रमांक नांव पद गांव
श्री. प्रकाश दत्तात्रय प्रधान पीठधिपती कळवा (ठाणे)
श्री. फक्‍कडराव बाबुराव तनपुरे अध्यक्ष खुपटी, ता. नेवासा
श्री. उल्हास भास्कर देशमुख उपाध्यक्ष कळवा (ठाणे)
श्री. गोरक्षनाथ हरि शिरसाठ सचिव बोल्हेगाव (नगर)
श्री. विष्‍णु राधाकिसन तिमाणे खजिनदार पुणे
श्री. विलास शिवराम सामंत विश्‍वस्त ठाणे
श्री. भाऊसाहेब रंगनाथ आढाव विश्‍वस्त चिंचवड (पुणे)
श्री. बाबुराव भाऊपाटील खालकर विश्‍वस्त कोपरगाव
श्री. गोपिनाथ मुरलीधर आढाव विश्‍वस्त बोल्हेगाव (नगर)
१० श्री. दिलीप दत्तात्रय प्रधान विश्‍वस्त अलिबाग
११ श्री. सुधीर गोविंद फळे विश्‍वस्त पाथर्डी (जि. नगर)
१२ श्री. दिलीप साहेबराव शिर्के विश्‍वस्त चिंचवड (पुणे)
१३ श्री. आदित्य उल्हास देशमुख विश्‍वस्त कळवा (ठाणे)
१४ श्री. सुदिप प्रकाश प्रधान विश्‍वस्त कळवा (ठाणे)
१५ श्री. अशोक तुकाराम गाडेकर विश्‍वस्त श्रीरामपूर

 

  अभिषेक निधी:

संस्थेतर्फे देवेंद्रनाथ अभिषेक निधी, व राघवेंद्रस्वामी अभिषेक निधी अशाप्रकारच्या दोन अभिषेक निधी योजना सुरु आहेत. ज्या भक्‍तांना अभिषेक निधी सभासद व्हावयाचे असेल किंवा इच्छा असेल त्यांनी संस्थेकडे रु.१००१/- जमा करावेत. अभिषेक निधीद्वारे जी रक्‍कम बॅंकेत मुदत ठेवीने ठेवली आहे. भक्‍तांनी सुचविलेल्या त्यांच्या जिवनातील अविस्मरणीय दिनांक संस्थेला कळविल्यास त्या दिनांकास राघवेंद्रस्वामी व देवेंद्रनाथ महाराज यांच्या पादुकावर अभिषेक केला जातो. व अभिषेकाचा प्रसाद भक्‍तांनी कळविलेल्या त्यांच्या पत्त्यावर रजिस्टर पोस्टाने/अंडर पोस्टींग सर्टिफिकेटने पाठविला जातो.

ज्या सभासदांचे पत्ते बदललेले असतील त्यांनी कृपया बोल्हेगांव अहमदनगर या संस्थेच्या कार्यालयाच्या पत्त्यावर लेखी कळवावे अगर दूरध्वनीद्वारे सबंधितांशी संपर्क साधावा की ज्यायोगे आपला अभिषेकाचा प्रसाद आपणास विनी विलंब मिळू शकेल.

 
शाळेची माहिती
संशोधन केंद्र माहिती
वाचनालय
रक्‍तदान शिबीर
आध्यात्मिक कार्यक्रम
Copyright 2011 © Aditya Deshmukh. All Rights Reserved. Website designed & developed by Manomay Informatics