Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

 
प. पू. श्री. देवेंद्रनाथ महाराज उर्फ श्री विजयकुमार सखाराम सुळे हे या कलियुगातील एक महान नाथपंथी सिध्‍द योगी होते. साधी रहाणी व उच्च विचारसरणी असलेले देवेंद्रनाथ महाराज हे व्यवसायाने वास्तूविशारद होते.

नाथ कार्य
नवध्यान योग
नवनाथ पोथीचे पारायण
गुरूमंत्र

 

 

प.पू.श्री देवेंद्र्नाथांच्या जीवनातील एक महत्वपुर्ण घटना म्हणजे नाथपंथी द्वैताद्वैत पीठाची स्थापना. या पीठाला एक महान अध्यात्मिक इतिहास आहे.

अहमदनगर येथील श्री. देवेंद्रनाथ महाराजांनी स्थापन केलेल्या द्वैदद्वैत पीठाला तसे ऐतिहसिक व धार्मिक महत्व आहे. नाथपंथात द्वैत । अद्वैत असा भेद नसून द्वैताशिवाय अद्वैत नाही, हा सिद्धांत आहे. श्री मच्छिंद्रनाथांच्या कौलाचारी साधनेत द्वैत हा भाव व अद्वैत ही अवस्था या तत्वाचा अदराने स्वीकार केला असल्याचे आढळते. श्री ज्ञानदेवांनी वरील दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या, दोन पद्‍धतींनी समाजासमोर ठेवल्या. एका बाजुला नामदेव, एकनाथ, तुकाराम इ. सर्व संतमंडळीनी भक्‍तीरसाचे रोप लाविले तर दुसरीकडे सत्यमल, गैबी, गुप्त, उद्‍बोध, केसरीनाथ, शिवदिननाथ ही सिद्‍धपरंपरा अशा दोन्ही आणण्याचे श्रेय श्री ज्ञाननाथांचे. संतपरंपरेचा प्रसार म्हणजे वारकरी संप्रदाय व सिद्‍ध परंपरेचा पुरावा म्हणजे वारकरी संप्रदाय व सिद्‍ध परंपरेचा पुरावा म्हणजे पैठणचा वरील मठ होय. श्री. शिवदिननाथांनी हा मठ स्थापन करुन नाथपंथाला स्थैर्य लाभले. पुढे राजाश्रयही मिळाला. पेशव्यांनी ३०० गावांची जहागिरी या मठाला नेमून दिली होती.

मात्र त्र्यंबकेश्‍वर गोरक्षनाथांचा जो मठ आहे. तो कानफाटे योगी ब्रम्हचाऱ्यांचा आहे. येथील पीठाधीश ब्रम्हचारी असतात. ते सांसारिक नसतात. उलट शिवशंकर हे गृहस्थाश्रमी होते. गृहस्थाश्रमी राहून देखील शुद्‍धाचरणाने व नियमित साधनेने हठयोगी बनू शकतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्री. देवेंद्रनाथ. ते संसारी होते. खऱ्या अर्थाने श्री शिवदिननाथांची परंपरा, हठयोग साधना त्यांनीच पुढे चालू ठेवली. द्वैताद्वैत पीठ हे त्याचे उत्तम उदाहरण होय.

दर अमावस्येला संपुर्ण नाथपंथी बाणा (वेष) धारण करुन होमहवनादि कर्मे झाल्यावर यौगिक क्रियांच्या साहयाने मढी येथे आलेल्या पिडित लोकांच्या हर प्रकारच्या व्याधी नष्ट करण्यासाठी जीव ब्रह्म सेवा महाराज करीत असत. ते हयात असेपर्यंत एकही अमावस्या त्यांनी चुकविली नाही. कारण नाथांचा तो आदेशच होता. अशा प्रकारे श्री.शिवदिननाथ केसरी यांनी गोरक्षनाथांची परंपरा महाराष्ट्राट रुजविली. तोच वारसा श्री. देवेंद्रनाथांनी पुढे चालविला आहे !

दिनांक ६ जुलै १९७४ रोजी गुरुपौर्णिमेचा दिवस होता. याचदिवशी श्री देवेंद्रनाथांनी विधीपूर्वक नगर येथील श्री मार्कंडेय मंदिरात या पिठाची प्रतिष्ठपना नाथांच्या आदेशाने केली. या शुभदिनी श्री देवेंद्रनाथांना व पीठीला आशिर्वाद देण्यासाठी सदगुरु परमचैतन्य दत्तात्रेय, आदिनाथासह सर्व नवनाथ व देवदेवता या दैवतांची उपस्थिती जाणवत होती. सिद्‍ध अग्निसाक्ष हवन विधी झाल्यावर वैदिक तसेच शास्त्रीय मंत्रांच्या जयघोषात या ऐतिहासिक धार्मिक पीठाची स्थापना झाली. तद्‍नंतर आपले सदगुरु स्वामी राघवेंद्रनाथ यांना नमन करुनच वरील देवदेवता या दैवतांची उपस्थिती जाणवत होती. सिद्‍ध अग्निसाक्ष हवन विधी झाल्यावर वैदिक तसेच शास्त्रीय मंत्रांच्या जयघोषात या ऐतिहासिक धर्मिक पीठाची स्थापना झाली. तद्‍नंतर आपले सदगुरु स्वामी राघवेंद्रनाथ यांना नमन करुनच वरील देवतांच्या उपस्थितीत श्री देवेंद्रनाथांनी नाथपंथी द्वैताद्वैत पीठाचा मुकुट धारण करुन आदिनाथांच्या परमपवित्र पीठावर ते स्थानापन्न झाले. मंगल वाद्ये वाजु लागली. पुष्पवृष्टी सतत होत होती. त्याचवेळी शंखध्वनी होताच वातावरण अत्यंत आनंदमय, मंगलमय, पवित्र झाले. त्यावेळी सर्वत्र दवणा, अत्तरचा सुगंध सर्व मंदिरभर दरवळू लागला. होमकुंड आपोआप तेजाने तळपू लागले. याचवेळी श्री देवेंद्रनाथांच्या चेहऱ्यावर एक दैवी तेज दिसू लागले. ते एकदम भावावस्थेत गेले.

"अलख" कुंभकातून आलेली व सुहास्य वदनातून बाहेर आलेली नाथवाणी झाली. "हम बहोत प्रसन्न है ! पीठ को छत्र होना ! यह पीठ आदिनाथका पीठ है । इसकी पवित्रता रखनी होगी । गुरु बिगर पीठपर कोई बैठना नही ।"

धीरगंभीर आवाजातील हा संदेश ऐकताच सर्व भक्‍त मंडळींचे भान हरपले नाहीत तरच नवल । सवत्र एकदम शांत वातावरण झाले. यापुढे या पीठांची हकिगत नाथवाणीतून ऐकावयास मिळाली ती अशी की या पीठाला ३०० वर्षांचा इतिहास आहे. हे पीठ गोरक्षनाथांच्या परंपरेतील आहे व शिवदिननाथ यांचा कडे पीठाचा वारसा आला आहे. तसेच श्री जालींधरनाथ व श्री कानिफनाथ यांचाही पैठणचा मठ समाजाभिमुख होता. त्याठिकाणी दुःखितांना दिलासा मिळत असे तोच वारसा हे पीठ चालवील, असे नाथांनी सांगितले.

  पीठातील दैवतांची मांडणी:

सामान्य लोकांना हे पीठ म्हणजे काय प्रकार आहे? याची कल्पना नसणे, सहज शक्य आहे. त्यांच्यासाठी थोडी माहीती देत आहे. या पीठामध्ये आदिनाथांच्या चांदीच्या पादुका असून त्यावर विशिष्‍ट तांत्रिक यंत्रे कोरली आहेत. चांदीचा मुकूट असून त्यावर काही तांत्रिक यंत्रे आहेत. नाथपंथी बाणा म्हणजे वेष, शैली, शृंगी, झोली (भस्माची व दुसरी माधुकरीची) नाथपंती जानवे, पुंगी, घुंगरू, चिमटा , त्रिशूळ, डमरू, शंख या वस्तू ठेवल्या असून त्यांची दररोज पूजा होते याखेरीज उच्च आसनासाठी गादी, लोड, तक्क्या, छत्र अशा दिमाखात हे पीठ स्थापना केले आहे. दररोजच्या पूजेखेरीज उत्सवाच्या वेळी या पीठाची विशेष प्रकारची पूजा होऊन आरती होते.

 

 वैशाख शुद्‍ध अमावस्येला शके १८९९  म्हणजे मंगळवार दि. १६ मे १९७७ रोजी  महाराजांच्या काही शिष्यांचे भाग्य  उजळले. यादिवशी महाराजांनी आपल्या  तीन शिष्यांना दिक्षा दिली व त्यांची  नावेही ठेवण्यात आली.


 रविवार दि. २५ ऑक्टोबर १९९८ रोजी  नाथपंथी द्वैताद्वैत पीठाधीश म्हणून  सद्‍अगुरू श्रीदेवेन्द्रनाथांच्या आदेशावरून  श्रीखगेन्द्रनाथांच्या दीक्षांत  समारंभ झाला.


Copyright 2011 © Aditya Deshmukh. All Rights Reserved. Website designed & developed by Manomay Informatics