Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

 
प. पू. श्री. देवेंद्रनाथ महाराज उर्फ श्री विजयकुमार सखाराम सुळे हे या कलियुगातील एक महान नाथपंथी सिध्‍द योगी होते. साधी रहाणी व उच्च विचारसरणी असलेले देवेंद्रनाथ महाराज हे व्यवसायाने वास्तूविशारद होते.

नाथ कार्य
नवध्यान योग
नवनाथ पोथीचे पारायण
गुरूमंत्र

 
 
 

प.पू. सद्‍गुरू श्री देवेंद्रनाथ महाराज उर्फ विजयकुमार सखाराम सुळे हे या कलियुगातील एक महान नाथपंथी सिध्‍द योगी होते. साधी रहाणी व उच्च विचारसरणी असलेले देवेंद्रनाथ महाराज हे व्यवसायाने वास्तूविशारद होते. त्यामुळे शिस्तप्रियता, व्यवस्थितपणा व नीटनेटकेपणा त्यांना प्रिय होता. त्यांचे बालपण रायगड जिल्ह्यातील पाली या गावी गेले. वडील श्री. सखाराम सुळे हे वनखात्यात रेंजर असल्याने गावोगावी त्यांची बदली होत असे. आई (सौ. माई) या नाथांच्या निस्सिम भक्‍त होत्या. उभयतांच्या संसावेलीवर दोन फुले उमलली पण ती अल्पायुषीच ठरली. त्यामुळे सौ. माई खिन्‍न असत. त्यातच त्या सतत आजारी पडू लागल्या. आपल्याच विचारांत दिवसेंदिवस खंगू लागल्या. एक दिवस अशाच विचारांत असताना एक साधू त्यांच्या घरी आला. त्याने मूठभर अंगारा माईंना दिला व म्हणाला माई दु:ख करू नकोस तूला आता मुलगा होईल व तो किर्तीवान होईल. असे सांगून तो निघून गेला. पुढे काही महिन्यांनंतर जो मुलगा झाला तेच आपले देवेंद्रनाथ होय. श्री देवेंद्रनाथ महाराजांचा जन्म १६ जून १९३७ रोजी झाला. त्यांचे मूळ नाव विजयकुमार सखाराम सुळे. ते जन्मत:च योगी असल्यामुळे अतिशय हुशार व कुशाग्र बुध्‍दिचे होते. शालेय जीवनात एक हुशार विद्यार्थी म्हणून ते विद्यार्थ्‍यांमध्ये व शिक्षकांमध्ये लोकप्रिय होते. माध्यमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांचे मातापित्याचे छत्र हरपले. त्यांनी आपले पुढील शिक्षण अतिशय कठिण परिस्थितीत पूर्ण केले. त्यांनी मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टस मधून वास्तू विशारद (A.I.I.E.G.D. Arch) ची पदवी संपादन केली.

मुंबईला नोकरीत असताना पॉंडेचरी येथील महान योगी श्री. अरविंद घोष यांचे भक्‍त श्री. मुखर्जी यांच्याशी त्यांचा संपर्क आला. श्री. मुखर्जीनी महाराजांना अनेक चमत्कार करून दाखविले. त्यामुळे महाराज प्रभावित झाले. त्यांनी मुखर्जी यांना आपल्याला गुरूमंत्र देण्याची विनंती केली. पण मुखर्जींनी मी तुझा गुरू नसून लवकरच तूला एक महान सद्‍गुरू लाभणार आहेत व माझ्यापेक्षाही अनेक मोठमोठे चमत्कार तू स्वत:च करून दाखवशील असे सांगितले. काही दिवसांनी त्यांना आंध्र प्रदेशातील मंत्रालयम्‌ येथील समाधिस्त श्री राघवेंद्र स्वामींनी दृष्‍टांत देऊन गुरूमंत्र दिला आणि दीक्षान्त नांव देवेंद्र असे ठेवले.


जन्मतिथी   : आषाढ शु. ९ (नवमी) शके १८५९
जन्मस्थान : पेण, तालुका - पेण, रायगड.
प्रहर : त्रिप्रहर
गोत्र : सांख्यान
शाखा : माध्यन्दिनी
वडीलांचे नाव : सखाराम
आईचे नाव : सीतामाई
आजोबांचे नाव : पांडुरंग
नाव : विजयकुमार
दीक्षान्त नाव : देवेंद्र
गुरू : श्री राघवेन्द्र
दिक्षा गोत्र : निरंजन
नाथ : चैतन्य कनिफनाथ
समाधी तिथी : वैशाख शु. (मोहीनी एकादशी)
शके १९०४ दि. ३ मे १९८२.
समाधी स्थळ : मयूर टेकडी, श्रीक्षेत्र मढी,
तालुका पाथर्डी, जिल्हा - अहमदनगर.

 

 
सिध्‍द श्री देवेंद्रनाथ
नाथ कार्य
श्री नवनाथ पोथीचे पारायण
नवध्यान योग
साधना मार्गाची माहिती
गुरुमंत्र
Copyright 2011 © Aditya Deshmukh. All Rights Reserved. Website designed & developed by Manomay Informatics