Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

 
प. पू. श्री. देवेंद्रनाथ महाराज उर्फ श्री विजयकुमार सखाराम सुळे हे या कलियुगातील एक महान नाथपंथी सिध्‍द योगी होते. साधी रहाणी व उच्च विचारसरणी असलेले देवेंद्रनाथ महाराज हे व्यवसायाने वास्तूविशारद होते.

नाथ कार्य
नवध्यान योग
नवनाथ पोथीचे पारायण
गुरूमंत्र

 

  प्राथामिक शाळा:

श्री नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्ट संचलित श्रीराघवेंद्र स्वामी विद्यानिकेतन बोल्हेगांव या नावाने संस्थेनी प्राथमिक शाळा (मराठी माध्यम) २००५ साली सुरू केली असून आतापर्यंत सर्व वर्गांचा निकाल १००% लागलेला आहे. चालू वर्षी वर्गवार पुढीलप्रमाणे:

  वर्ग विद्यार्थी संख्या
१) बालवाडी ८०
२) इयत्ता १ ली ३५
३) इयत्ता २ री ४०
४) इयत्ता ३ री ३३
५) इयत्ता ४ थी ४२
६) इयत्ता ५ वी ३७
७) इयत्ता ६ वी  
८) इयत्ता ७ वी २६
  एकूण २९३

एकूण विद्यार्थी संख्या २९३ पहाता या संस्थेच्या शाळेची प्रगती चांगली आहे. मागील वर्षापासून संस्थेतर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटप करण्यात आली आहेत. त्यासाठी मुंबई, ठाणे येथील भक्‍तांनी आर्थिक सहाय्य दिले आहे. संस्था त्यांची आभारी आहे.

संस्थेतील शाळेसाठी स्वतंत्र इमारत नाही. नियोजीत नकाशाप्रमाणे शाळेसाठी इमारत बांधकाम सुरू करणेबाबतचा ठराव संस्थेने मंजुर केला असून त्याबाबत नकाशा मंजुरीसाठी महापालिकेकडे सादर केला आहे. सदरची इमारत जी +२ अशी नियोजीत असून अंदाचे १ कोटीचे नियोजन आहे.

भक्‍तांच्या सहकार्यातून सदरची इमारत २ वर्षात पूर्ण होईल असा संस्थेचा मानसं आहे.

संस्थेकडून महाराष्‍ट्र शासनाकडे माध्यमिक शाळेचा प्रस्ताव देखील सादर केला आहे. यावर्षी दोन नवीन शिक्षकांची नेमणूक केली असून मुख्याध्यापकासह एकूण आठ शिक्षक कार्यरत आहेत.

  देवेंद्र सार्वजनिक वाचनालय

 

संस्थेने २००४ साली देवेंद्र सार्वजनिक वाचनालय सुरू केलेले आहे. महाराष्‍ट्र शासनाकडून मिळालेल्या अनुदानातून काही नवीन पुस्तके खरेदी केली आहेत. तसेच सभासदांच्या सहकार्याने (देणगीने) अनेक नवीन विषयांच्या पुस्तकांची भर पडलेली आहे. बोल्हेगांव परिसरातील तसेच नगर शहरातील नागरिकांचा, नाथभक्‍तांचा या वाचनालयास चांगला प्रतिसाद आहे. याशिवाय नाथ सांप्रदायावरील संशोधन करणाऱ्या प्राध्यापक मंडळीनांही या वाचनालयाचा चांगला उपयोग होतो. या वाचनालयामधून ५ ते ६ प्राध्यापकांनी पी. एच. डी. साठी संदर्भ ग्रंथाचा आधार घेवून पी. एच. डी. पदवी मिळविली आहे. या वर्षात एकूण रू. १६६७७/- ची नवीन पुस्तके घेतली आहेत. त्यामध्ये बालवाङ्‍मय, कथा, कादंबरी, चरित्र, आध्यत्मिक पुस्तके, ग्रंथ इत्यादींचा समावेश आहे.

तसेच मासिके, नियत कालिके व वर्तमानपत्रे इत्यादि मोठ‍या प्रमाणांत आहेत. भक्‍तांनी त्यांच्याकडे असलेली जुनी पुस्तके ग्रंथालयास भेट म्हणून देवून गुरूकार्यास हातभार लावावा ही विनंती.

  रक्‍तदान शिबीर

श्री देवेंद्रनाथ मठी, पुणे येथे जमणाऱ्या गुरूबंधु आणि नाथभक्‍तांपैकी काहींनी श्री प्रेमेंद्रनाथ महाराज (श्री प्रशांत चिंचोलकर) यांच्या मार्गदर्शनाखाली आपले सद्‍गुरू श्री देवेंद्रनाथ महाराज यांच्या वाढदिवसा निमित्त (दि.१६/०६/२०१०), सद्‍गुरू सेवेतील रचनात्मक समाजसेवेचा भाग म्हणुन ‘रक्‍तदान ही महान सेवा’ दि. २६/०६/२०१० रोजी सद्‍गुरूंच्या प्रेरणेने करण्यास आली. या मागील मुख्य आशय तो असा....

कर्ण फुंकूनी देवेंद्र, देई ‘द्रां’ बीज महान कर्णातूनी जाई हृदयात;

फिरे तेथुनी सारे शरीर, रूप होऊनी ‘लाल’

वरील ओवी प्रमाणे आपल्या शरीरात सद्‍गूरू कृपेने मिळालेल्या ‘द्रां’ ने प्रफुल्लीत होऊन वाहणारे रक्‍त हे जनकल्याणाकरीताच प्रवाहीत व्हावे आणि ज्या शरीरात हे रक्‍त जाईल ते शरीर कोठेतरी आध्यात्मीक कार्यात यावे अशी शुध्द भावना मनी ठेवुन अनेक नाथभक्‍तांनी रक्‍तदान केले.

 
शाळेची माहिती
संशोधन केंद्र माहिती
वाचनालय
रक्‍तदान शिबीर
आध्यात्मिक कार्यक्रम
Copyright 2011 © Aditya Deshmukh. All Rights Reserved. Website designed & developed by Manomay Informatics