Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

 
प. पू. श्री. देवेंद्रनाथ महाराज उर्फ श्री विजयकुमार सखाराम सुळे हे या कलियुगातील एक महान नाथपंथी सिध्‍द योगी होते. साधी रहाणी व उच्च विचारसरणी असलेले देवेंद्रनाथ महाराज हे व्यवसायाने वास्तूविशारद होते.

नाथ कार्य
नवध्यान योग
नवनाथ पोथीचे पारायण
गुरूमंत्र

 

श्री शंकर हे नाथपंथीचे दैवत. त्याला ‘आदिनाथ’ असे संबोधितात. या शंकाराचे एक जीर्ण हेमाडपंथी मंदिर मढी येथे आहे. त्याला सिद्‍अधेश्‍वराचे मंदिर असे म्हणतात.

मंदिराचा जिर्णोद्‍अधार करण्याचे देवेंद्रनाथांनी मनावर घेतले. शंकरासमोरील नंदी कित्येक वर्षे उघड्यावर असल्याने तो जीर्ण होऊन खूप झिजला होता. त्याऐवजी नवीन नंदीची मूर्ती घडवावी व समोरील ओटा बांधून त्यावर नंदीची स्थापना करावी असे श्री देवेंद्रनाथांनी संकल्प केला.

त्याप्रमाणे नवीन ओटा व नंदी तयार झाला व विधीपूर्वक सन १९७७ मध्ये श्रावण अमावस्येच्या दिवशी म्हणजे पोळ्याच्या सणाच्या दिवशी त्याची स्थापना केली. या स्थापनेच्या वेळी आदिनाथांनी आशीर्वाद दिला व आदेश असा दिला की, "श्री नंदीनाथ हे मला गुरूसमान आहे त्यांची स्थापना इतक्या साध्या पद्‍अधतीने न करता एखाद्या यज्ञ सोहळ्याने करावी." आदिनाथांचा हा आदेश भाव अवस्थेत मिळाला. महाराजांनी त्याच क्षणी ‘शिवयाग’ करण्याचा संकल्प सोडला व त्या तयारीला लगेच लागले.

शिवयागाची सुरूवात ८ मे १९७९ रोजी वैशाख शुद्‍अध द्वितीयेला व पूर्णाहूती १२ मे १९७९ रोजी वैशाख पौर्णिमेला झाली. वैशाख पौर्णिमा हा चैतन्य गोरक्षनाथांचा जन्म दिवस. तो योग मुद्दाम साधला गेला.

शिवयागाचे मुख्य पुरोहित त्र्यंबकेश्‍वर येथील नाथपंथी पंडे श्री. बापूजी धारणे हे होते. त्यांना ‘धारणे गुरूजी’ असे संबोधितात. त्यांच्या उपस्थितीखेरीज त्र्यंबकेश्‍वर येथील नाथपंथीयाचा मेळावा, त्यांची कार्ये संपन्न होत नाहीत. मुख्य अतिथी होते, नेपाळचे राजपुरोहित विद्यालंकार श्री नरहरी नाथ. तसेच यजमान होते, श्री चंद्रकांत सुळे म्हणजे महाराजांचे वडील बंधू, हा मान त्यांना केवळ वडील बंधू म्हणून मिळाला नसून नाथपंथातील एक श्रेष्‍ठ साधक म्हणून दिला होता. त्यांना चैतन्य मच्‍छिंद्रनाथांची भाववस्था अनेक वर्षापासून येत असे. असा हा योग जुळून आला. कारण आदिनाथ या दैवताचा आशीर्वाद त्यामागे होता!

दर अमावस्येला संपूर्ण नाथपंथी बाणा (वेष) धारण करुन होमहवनादि कर्मे झाल्यावर यौगिक क्रियांच्या साह्याने मढी येथे आलेल्या पिडित लोकांच्या हर प्रकारच्या व्याधी नष्ट करण्यासाठी जीव ब्रम्ह सेवा महाराज करीत असत. ते हयात असेपर्यंत एकही अमावस्या त्यांनी चुकवली नाही. कारण नाथांचा तो आदेशच होता. अशा प्रकारे श्री. शिवदिननाथ केसरी यांनी गोरक्षनाथांची परंपरा महाराष्ट्रात रुजविली. तोच वारसा श्री. देवेंद्रनाथांनी पुढे चालविला आहे!

 
सिध्‍द श्री देवेंद्रनाथ
नाथ कार्य
श्री नवनाथ पोथीचे पारायण
नवध्यान योग
साधना मार्गाची माहिती
गुरुमंत्र
Copyright 2011 © Aditya Deshmukh. All Rights Reserved. Website designed & developed by Manomay Informatics