Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

 
प. पू. श्री. देवेंद्रनाथ महाराज उर्फ श्री विजयकुमार सखाराम सुळे हे या कलियुगातील एक महान नाथपंथी सिध्‍द योगी होते. साधी रहाणी व उच्च विचारसरणी असलेले देवेंद्रनाथ महाराज हे व्यवसायाने वास्तूविशारद होते.

नाथ कार्य
नवध्यान योग
नवनाथ पोथीचे पारायण
गुरूमंत्र

 

सोमवार दिनांक ३ मे १९८२ रोजी सद्‍गुरू श्रीदेवेंद्रनाथांनी योगमायेने संजीवनी समाधी घेतली. त्यानंतर त्यांचे उत्तरधिकारी जेष्‍ठ शिष्य श्री जितेंद्रनाथ (कै. गंगारामजी विद्ये) यांच्याकडे पीठाचा वारसा आला. त्यांनी सद्‍अगुरू आदेशनुसार आध्यात्मिक कार्य केले आणि रविवार दिनांक ३ मे १९९८ रोजी ते चैतन्यात विलीन झाले. त्यानंतर सद्‍अगुरू श्रीदेवेंद्रनाथांच्या आदेशानुसार त्यांचे लाडके शिष्य श्रीखगेन्द्रनाथजी (श्री. प्रकाश प्रधान) यांचा रविवार दिनांक २५ ऑक्टोबर १९९८ रोजी पीठाधीपती म्हणून दीक्षांत विधी करण्यात आला.

  श्रीखगेन्द्रनाथ दीक्षांत विधी:

रविवार दि. २५ ऑक्टोबर १९९८ रोजी नाथपंथी द्वैताद्वैत पीठाधीश म्हणून सद्‍अगुरू श्रीदेवेन्द्रनाथांच्या आदेशावरून श्रीखगेन्द्रनाथांच्या दीक्षांत समारंभ झाला. या ऐतिहासिक आध्यात्मिक घटनेला बारा वर्षे म्हणजे एक तप पूर्ण होत आहे. त्यानिमित्त या तपपूर्तीचा स्वात्मानंद जसा प. पू. श्री खगेन्द्रनाथांना होत आहे तसाच तो माझ्यासारख्या असंख्य भक्‍तांनाही निश्चित होत आहे.

  श्रीखगेन्द्रनाथांचे कार्य:

प.पू. श्रीखगेन्द्रनाथांनी १९९८ ते २०१० या बारा वर्षाच्या कळांत अनेक आध्यात्मिक, रचनात्मक, धार्मिक व सांस्कृतिक कार्य केले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने बोल्हेगांव (अहमदनगर) या ठिकाणी स्वामी राघेवेन्द्रतीर्थ यांच्या वृंदावनाची उभारणी, तेथील परिसराची सुंदर आखिव व रेखीव बांधणी, तसेच त्या परिसरात शाळा, वाचनालय, मंगलकार्यालय, बागबगीचा इत्यादी अनेक लोकोपयोगी कार्ये सुरू केली व बोल्हेगांव परिसराचे नंदनवन केले.

श्रीक्षेत्र मढी (तालुका-पाथर्डी, जिल्हा-अहमदनगर) येथे चैतन्य श्रीसद्‍अगुरू देवेंद्रनाथ महाराज यांचे अतिशय भव्य व सुंदर शिवपिंडीच्या आकाराचे समाधिमंदिर बांधले, तसेच त्यासमोर यज्ञकुंड व बजूला श्रीदत्तमंदिर, श्रीमहालक्ष्मीमंदिर व श्री हनुमानजी यांची मंदिरे उभारण्यात आली. मढीमध्ये संस्थेच्या जागेत अतिशय भव्य असे भक्‍त निवास बांधण्यात आले. स्त्रियांसाठी सर्व सोयीनीयुक्‍त वेगळा महिला आश्रम बांधला, तसेच विश्वस्त व दीक्षांत नाथजी यांच्यासाठी वेगळ्या खोल्या, पीठीधीपतींचे सुंदर विश्रांतीस्थान, भटारखाना इत्यादी अनेक वास्तु उभारून भक्‍तांच्या सोयीसांठी मोठे कार्य केले आहे. प.पू. श्रीदेवेंद्रनाथ महाराज यांनी १९७५ मध्ये नाथसांप्रदाय या विषयी सविस्तर माहिती देणारा "अलख निरंजन" हा दीपावली अंक सुरू केला. त्या अंकाचे प्रकाशन आजपर्यंत चालु ठेवण्याचे महान ज्ञानयज्ञ खगेन्द्रनाथांनी चालू ठेवले आहे.

प.पू. श्रीखगेन्द्रनाथांनी आपले सद्‍गुरू श्री देवेंद्रनाथ महाराज यांचे आध्यात्मिक कार्य सातत्याने पुढे चालु ठेवले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने प्रत्येक महिन्याच्या दर्शनी अमावस्येला करण्यात येत असलेले होम-हवन विधी, जीव ब्रम्ह-सेवा, अपत्य प्राप्तीसाठी स्त्रियांची ओटी भरणे, गुरूमंत्र देणे, सत्संगातून भाविक जनांना मार्गदर्शन करणे इत्यादी.

श्रावण महिन्यात ‘नाथ दिंडी’ काढून गावोगांवी भक्‍तांच्या घरी जाणे, वेगवेगळ्या नाथ मठांमध्ये किंवा मंदिरात होम-हवन करणे, जीव ब्रम्ह-सेवा करणे, व्यसनमुक्‍तीसाठी कार्यक्रम राबविणे, संस्थेच्या कार्यासाठी नाथांची झोळी फिरवून आर्थिक सहाय्य मिळविणे. कळवा (जिल्हा-ठाणे) येथे मठामध्ये दर गुरूवारी येणाऱ्या भक्‍तांच्या शारिरीक व मानसिक व्याधी दूर करणे सत्संग घेऊन त्यांना आध्यात्मिक सन्मार्गाला लावणे इत्यादी कार्ये करत असतात.

श्रीक्षेत्र मंत्रालयम (आन्ध्र प्रदेश) याठिकाणी प्रत्येक वर्षी माघ महिन्यात असंख्य भाविक भक्‍तांना बरोबर घेऊन जाऊन त्या ठिकाणी तीन दिवस स्वामींची सेवा करणे, होम-हवन, सत्संगाचे कार्यक्रम करणे, माघ पौर्णिमेच्या दिवशी पंचमुखी हनुमान व श्रीमहालक्ष्मी मंदिरात होम हवन करणे, सद्‍अगुरू आदेशानुसार काही भक्‍तांना दीक्षा देऊन त्या दीक्षांत नाथजींकडून आध्यात्मिक, रचनात्मक कार्य करवून घेणे, त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे.

प.पू. श्रीखगेन्द्रनाथांनी वर नमूद केल्याप्रमाणे अनेक आध्यात्मिक व रचनात्मक कार्य केले असले तरी, त्यांचे मोलाचे कार्य म्हणजे "सिध्दकाव्य" निर्मिती करणे होय. सद्‍अगुरूकृपेने त्यांना हे सिध्दकाव्य स्फुरते. आतापर्यंत सुमारे तीन हजार पाचशे (३५००) सिध्द गीते त्यांना स्फुरलेली आहेत. त्यातील काही गीते दोन भागात प्रकाशीत झाली आहेत. ‘अलख निरंजन’ दिपावली अंकात श्रीखगेन्द्रनाथ ‘राजयोगी उवाच’ हे सदर आपल्या खुमासदार व आकर्षक शैलीने सजवतात. त्यांची ही वाङ्‍मय सेवा म्हणजे त्यांच्यावर असलेली अलौकीक सद्‍अगुरू कृपाच होय.

 

  प.पू.श्री देवेंद्र्नाथांच्या जीवनातील एक   महत्वपुर्ण घटना म्हणजे नाथपंथी   द्वैताद्वैत पीठाची स्थापना. या पीठाला   एक महान अध्यात्मिक इतिहास आहे.


 वैशाख शुद्‍ध अमावस्येला शके १८९९  म्हणजे मंगळवार दि. १६ मे १९७७ रोजी  महाराजांच्या काही शिष्यांचे भाग्य  उजळले. यादिवशी महाराजांनी आपल्या  तीन शिष्यांना दिक्षा दिली व त्यांची  नावेही ठेवण्यात आली.


Copyright 2011 © Aditya Deshmukh. All Rights Reserved. Website designed & developed by Manomay Informatics