Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

 
प. पू. श्री. देवेंद्रनाथ महाराज उर्फ श्री विजयकुमार सखाराम सुळे हे या कलियुगातील एक महान नाथपंथी सिध्‍द योगी होते. साधी रहाणी व उच्च विचारसरणी असलेले देवेंद्रनाथ महाराज हे व्यवसायाने वास्तूविशारद होते.

नाथ कार्य
नवध्यान योग
नवनाथ पोथीचे पारायण
गुरूमंत्र

 
 
 

पारायण करताना भक्‍त मंडळींनी कोणते नियम पाळावेत जेणेकरुन त्यांचे पारायण निर्विघ्नतेने पार पडेल व त्यातून फलश्रुती मिळेल यासाठी नाथभक्‍तास थोडेसे मार्गदर्शन करीत आहे.

पारायण करताना त्या भक्‍ताने आपल्या घरातील देवघराची खोली पाण्याने पुसून स्वच्छ करावी. रांगोळी काढून त्यावर चौरंग किंवा पाट मांडावा. त्यावर वस्त्र घालून वाचावयाची पोथी व सद्‍अगुरुंचा फोटो असल्यास तो मांडावा. चौरंगावर उजव्या बाजुस पाण्याने किंवा धान्याने भरलेला कलश ठेवावा.

श्री सिध्दीविनायक, कुलदैवत व सदगुरुचे विडे मांडावेत. विडयांवर ठेवली जाणारी सुपारी गायत्री मंत्राने अभिमंत्रून घ्यावी. ती आपल्या हृदयाशी धरुन अत्यंत भक्‍तीपूर्वक अंतःकरणातून प्रार्थना करुन त्या दैवतास आवाहन करावे. तीन वेळा आवाहन झाल्यावर ती सुपारी त्या त्या विडयांवर मांडावी. अशाप्रकारे मांडलेल्या विडयांचे हळद कुंकू, अक्षता, फुले वाहून पुजन करावे. आता मांडलेले ते विडे नसुन आमंत्रित दैवते आहेत या भावनेतुन त्यांची पूजा रोज करुन धुपदीपाने ओवाळणी करावी. दुध, खडीसाखर किंवा फळांचा नैवेद्य दाखवून त्यांना नमस्कार करावा.

आपण ज्या कामासाठी पारायणास बसणार आहोत. ते कारण भक्‍तीपूर्वक अंतःकरणातून ह्या दैवतांना सांगून व त्यावेळी पाळणार असणारे नियमही सांगावेत. हे सांगत असताना हातात नारळ धरावा नंतर तो चौरंगावरील कलशावर ठेवावा. आसनावर बसून वाचन कारावे. जे नियम पहिल्या दिवशी पाळू तेच नियम समाप्तीपर्यंत पाळावेत. पोथी वाचण्यापुर्वी आंघोळ करुन सोवळे किंवा धूतवस्त्र नेसावे . सकाळ संध्याकाळ वाचन करावयाचे झाल्यास संध्याकाळीही आंघोळ करुनच बसावे. दिवसातून दोन वेळा वाचन पहिल्या दिवशी केल्यास समाप्ती सकाळी किंवा संध्याकाळीही आंघोळ करुनच बसावे. दिवसातून दोन वेळा वाचन पहिल्या दिवशी केल्यास समाप्ती सकाळी किंवा संध्याकाळी केल्यास चालते. सकाळच्या वाचनाला सुर्य देवतेची साक्ष असते तर संध्याकाळी चंद्राची साक्ष असते तर संध्याकाळी चंद्राची साक्ष असते म्हणून कोणत्याही वेळी समाप्ती केली तरी चालते. मात्र एकचवेळी पारायण केल्यास ज्यावेळी सुरुवात केली असेल त्याच दैवताच्या साक्षीने समाप्ती करावी. म्हणजे पोथी सकाळी सुरु केली असल्यास समाप्ती सकाळी करावी व सायंकाळी सुरु केली असल्यास सायंकाळी समाप्ती करवी. साध्या नेहमीच्या पारायाणात नियम जास्त कडक नसले तरी पोथी वाचनाच्या काळात मांसाहार करु नये, शुचीर्भूतता पाळावी. (सोवळे पाळावे) रोज सायंकाळी पोथी वाचन झाल्यावर धुपारती करावी. नाथपोथीचे चाळीस अध्याय पुर्ण वाचून झाल्यावर पोथीस नवीन वस्त्र व हार घालुन त्यांची गंध अक्षता वाहुन पुजा करावी व नाथांची, दत्तत्रयांची, शंकराची व सद्‍गुरुंची आरती करावी. आरती झाल्यावर महाप्रसादाचा नैवेद्य दाखवावा. नैवेद्यात खीर, वडे व हरभऱ्याची उसळ असावी. कारण हे नाथांना आवडणारे पदार्थ आहेत. नाथांना व इष्ट दैवतांना नैवेद्य दखवुन झाल्यावर आणखी एका नैवेद्याचे ताट गायीसाठी द्यावे. नंतर नाथांना साष्टांग नमस्कार करुन पारायण काळामध्ये झालेल्या चूकांबद्दल क्षमा मागावी व अशीच तुमची माझ्यावर सदैव कृपादॄष्टी असावी अशी प्रार्थना करावी.

  उत्तर पूजा:

अक्षता आपल्या हृदयापाशी धरुन आवाहन केलेल्या दैवतांना निरोप द्यावा. उत्तरपुजा करतेवेळी भक्‍तीपुर्वक अंतःकरणातून प्रथम दैवतांचे बोलवल्याप्रमाणे आल्याबद्दल आभार मानावेत व आता आपण जनकल्याणासाठी आपल्या स्थानांवर गमन करावे अशी प्रार्थना करावी व त्या अक्षता त्या विडयांवर व कलशांवर पुनरागमनायच असे म्हणून वाहाव्यात. कलशातील पाणी आपल्या घरात शिंपडावे व उरलेले पाणी तुळशीत सोडावे. नंतर हे निर्माल्य वाहत्या पाण्यात विसर्जन करावे व संकल्पाचा नारळ त्वरित फोडून तो प्रसाद कुटूंबातील सर्वांनी ग्रहण कर

  पारायण काळात पाळावयाचे नियम :

 

१) दिवसातून एकवेळ उपवास करावा. (त्या वेळेस उपवासाचे पदार्थ खावेत) व दुसऱ्या वेळेस चपाती भाजीचा नैवेद्य दाखवून मगच ग्रहण करावा.

२) पारायण काळात बाहेरील पदार्थ खाऊ नयेत.

३) ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे

४) गादीवर झोपू नये. या काळात चटई / सतरंजीवर किंवा कांबळयावर झोपावे.

५) पारायण काळात सुयर/सुतक आल्यास पारायण तेथेच थांबवून दूसऱ्या व्यक्‍तीकडून त्याचे विसर्जन कराव

टीप : श्री नवनाथ पोथीचे पारायण मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता करावे. हे पारायण स्त्रियांनीसुध्दा करायला हरकत नाही.

  नवनाथ पोथी पारायणाचे महत्त्व :

 

१) प्रापंचीक अडचणी दूर होतात.

२) घरात शांती व प्रसन्नता येते.

३) घरांतील वास्तूंत किंवा घरांतील व्यकतींस बाहय बाधा असल्यास ती नाथपोथी वाचनांतून निघून जाते.

४) स्वप्नबाधा किंवा प्राकृतिक आजार नाथ कृपेंतून दोष मुक्‍त

 
सिध्‍द श्री देवेंद्रनाथ
नाथ कार्य
श्री नवनाथ पोथीचे पारायण
नवध्यान योग
साधना मार्गाची माहिती
गुरुमंत्र
Copyright 2011 © Aditya Deshmukh. All Rights Reserved. Website designed & developed by Manomay Informatics