Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

 
प. पू. श्री. देवेंद्रनाथ महाराज उर्फ श्री विजयकुमार सखाराम सुळे हे या कलियुगातील एक महान नाथपंथी सिध्‍द योगी होते. साधी रहाणी व उच्च विचारसरणी असलेले देवेंद्रनाथ महाराज हे व्यवसायाने वास्तूविशारद होते.

नाथ कार्य
नवध्यान योग
नवनाथ पोथीचे पारायण
गुरूमंत्र

 
 
 
  पूर्वतयारी:

 

१) आसन: पद्‍अमासनात बसून हात जमिनीवर दोन्ही बाजूला टेकवून त्यांच्या आधाराने शरीर वर उचलायचे व झोपळ्याप्रमाणे ३ वेळा हिंदोळे (झोके) घ्यायचे. असे ३ वेळा करायचे. त्यानंतर त्याच स्थितीत बसून पाठ न वाकवता मांडी ३ वेळा छातीला लावायची. हे करत असताना शरीरावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करू नये.

 

२) प्राणायम: उजवी नाकपूडी अंगठयाने बंद करून डाव्या नाकपूडीने पूरक (श्‍वास घ्यावा) करावा. नंतर तर्जनीने डावी नाकपूडी बंद करून कुंभक (श्‍वास रोधावा) करावा. त्यानंतर अंगठा बाजूला काढून रेचक करावा. असे ३ वेळा करावे. पूरक-कुंभक-रेचकाचे प्रमाण १:४:२ असावे. यावेळी कोणत्याही प्रकारची जबरदस्ती किंवा अतिरेक करू नये.

 

३) भस्त्रिका : यात फक्‍त पूरक व रेचकच होतो. कुंभक होत नाही. या क्रियेला कपालभाती असेही म्हणतात. भस्त्रिकेची सुरूवात सूक्ष्म लयाने करून ती लय हळूहळू वाढवावी. लय वाढवीत वाढवीत आपल्याला जितका वेळ ह्याचे स्पंदन ठेवता येईल तेवढे ठेवून नंतर स्पंदन एकदम न थांबविता हळूहळू लय मंद करत करत परत सूक्ष्माकडे आणावी. अशी भस्त्रिका ३ वेळा करावी. त्यावेळी फक्‍त पोटाचीच हालचाल करावी व शरीर हलू नये म्हणून हाताचे तळवे मागील बाजूस जमिनीवर टेकवून कोपरांचा बरगड्यांच्या बाजूने आधार घ्यावा.

 

४) ॐकार: किमान ३ वेळा दीर्घ ॐकार करावा.

 

  पूर्वार्ध:

 

१) भृग, ऋत व भग या देवतांची उभी रक्षाकंकणे घेणे.

२) मानसपूजा: डोळे मिटून मनानेच गुरूंची पूजा करावी. किती वेळ साधना करणार ते सद्‍अगुरूंना सांगणे. यात भाव निर्माण व्हायला पाहिजे हा महत्त्वाचा भाग आहे.

३) कुलदैवताचे शिरस्थानावर आरोहण व स्थानापन्‍नता.

४) गुरूमंत्रीत दैवतास आहावन व हृदयकमलावर स्थानपन्‍नता.

५) श्री गणेशाचे स्मरण व मंत्रपठण - ॐ गं गं गणपतये नम:

६) महाविष्‍णू, महलक्ष्मी, महासरस्वती व महाकाली दैवतांचे शरीराभोवती (आडवी) रक्षाकंकणे घेणे.

७) गुरूमंत्रीत दैवतास (सद्‍गुरू श्री देवेंद्रनाथस) सविनय, भक्‍तीपूर्ण प्रार्थना करून जपध्यान सुरू करण्याविषयी विनंती करणे.

८) गुरूमंत्राचे जपध्यान.

९) ध्यानयोगाची सांगत

 

  उत्तरार्ध:

 

१) गुरूमंत्रीत दैवतास ध्यान थांबविण्याची विनंती करणे.

२) रक्षाकंकण देवतांना (महाविष्णू, महालक्ष्मी, महासरस्वती व महाकाली) नमन करून त्यांची भक्‍तिपूर्ण मानसपूजा करून विनयाने गमन करण्यास सांगणे.

३) कुलदेवतेचे स्तवन भक्‍तिभावाने करून त्यांना विनयाने गमन करण्यास सांगणे.

४) भृग, ऋत व भग या दैवतांना नमन करून त्यांनाही विनयाने गमन करण्यास विनवणे.

५) हृदय कमलावरील गुरूमंत्रीत दैवतास भक्‍तीपूर्ण नमस्कार करून गमन न करीता सातत्याने वास्तव्य करण्याची विनंती करणे व स्थिर रहाणे.

६) गुरूचे स्तवन करून गुरूला साधनेच्या कर्माचे फळ अर्पण करावे.

 
सिध्‍द श्री देवेंद्रनाथ
नाथ कार्य
श्री नवनाथ पोथीचे पारायण
नवध्यान योग
साधना मार्गाची माहिती
गुरुमंत्र
Copyright 2011 © Aditya Deshmukh. All Rights Reserved. Website designed & developed by Manomay Informatics