Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

 
प. पू. श्री. देवेंद्रनाथ महाराज उर्फ श्री विजयकुमार सखाराम सुळे हे या कलियुगातील एक महान नाथपंथी सिध्‍द योगी होते. साधी रहाणी व उच्च विचारसरणी असलेले देवेंद्रनाथ महाराज हे व्यवसायाने वास्तूविशारद होते.

नाथ कार्य
नवध्यान योग
नवनाथ पोथीचे पारायण
गुरूमंत्र

 
 
 

महाराजांच्या घरांत नाथसांप्रदायिक पूजाअर्चा, पोथीपारायण होत असल्याने लहानपणापासूनच त्यांच्यावर नाथपंथाचा प्रभाव होता. एकदा ते मढी ता. पाथर्डी, जि. अहमदनगर येथे नवनाथांतील चैतन्य कानिफनाथांच्या दर्शनास गेले असताना गुरूकृपेने त्यांना कानिफनाथांनी प्रत्यक्ष दर्शन देले; मे तुझी बरेच वर्षापासून वाट बघत होतो. असे सांगून या मंदिराला आलेली अवकळा, पूजेतील उणीवा, तसेच दु:खी आत्म्यांच्या दु:खनिवारणासाठी तू येथे येऊन सेवा कर त्यासाठी मी तूला जीव-ब्रम्ह सेवेचे व्रत देतो असे सांगून आपल्या सेवेत रूजू करून घेतले. त्यामुळे देवेंद्रनाथ महाराजांनी मढी हीच आपली कर्मभूमी आहे हे जाणले. महाराजांनी मढी येथे मंदीर परिसराचा कायापालट केला. लाईट व पाण्याची सोय करून कानिफनाथांची नित्य पूजा अर्चा, व दर अमावस्येला देवेंद्रनाथ महाराज हे संपूर्णत: नाथबाणा परिधान करून नाथांची पूजा, होमहवन करून जीवब्रम्ह सेवा करीत असत. यांत आपल्या तपसामर्थ्याने ते दु:खी पिडीत लोकांच्या शारीरीक, मानसिक व्याधी बऱ्या करणे, निपुत्रिक असलेल्या स्त्रियांची संतानप्राप्ती होण्यासाठी अभिमंत्रीत नारळाने ओटी भरणे, आध्यात्मिक उन्नतीसाठी नाथभक्‍तांना गुरूमंत्र देणे हे कर्म करित असत. असाध्य रोगाने पछाडलेले अनेक रोगी ते बरे करीत. यौगिक सामर्थ्याने परकाया प्रवेश करून बिना ऑपरेशन जटिल रोग पूर्णत: ते बरे करत. वस्त्रही अंगावर न ठेवणाऱ्या वेड्यास बरे करणे, आंधळ्यास दृष्‍टी देणे, मुक्यांस बोलते करणे, शिष्यांसह वाटेत जात असताना मुसळधार पाऊस कोसळत असताना देखील स्वत:सह शिष्यांना कोरडे ठेवणे, मोटारातील पेट्रोल संपले असताना विना पेट्रोल गाडी चालविणे, भक्‍ताकडे पाहून त्याच्या मृत्यूची चाहूल लागताच त्याचे आयुष्य वाढविणे. एकाच वेळी अनेक ठिकाणी भक्‍तांस दर्शन देणे अशा अनेक किमया सद्‍गुरू श्री देवेंद्रनाथ महाराजांनी करून दाखविल्या.

श्री देवेंद्रनाथ महाराज हे पारिवारिक होते. पत्‍नी व दोन मुलांचे छोटे कुटुंब असलेल्या महाराजांनी संसारात राहूनदेखील अध्यात्मातील सर्वोच्च स्थान प्राप्त करता येते हे स्वत: दाखवून दिले. चै. कनिफनाथांच्या आदेशानुसार त्यांनी नगर येथे श्री नाथपंथी द्वैताद्वैत पीठाची स्थापना केली व संसारीक असलेल्या आपल्या भक्‍तगणांना , शिष्यांना, साधकांना साधनेतून जीवब्रम्हसेवा व जीवब्रम्हसेवेतून अध्यात्मिक उन्‍नती प्राप्त व्हावी म्हणून हे पीठ कार्य करेल असे स्पष्‍ट केले. हठयोग शिबिरांतून साधकांना केले. दर अमावस्येला सायंकाळी ते मयूर टेकडी येथे भस्म समाधी साधना करीत असत. या समाधीच्या वेळी ते भस्म कुंडात बसून भस्म समाधी घेत असत. या साधनेतून त्यांना शिवसामरस्य सिध्दि प्राप्त झाली. विश्‍व शांतीसाठी शिवयागासारखा महान यज्ञ त्यांनी मढी येथे केला. देवेंद्रनाथ महाराजांनी आपल्या जीवनात बरेच यज्ञयाग केले. त्याम्तील हा सर्वात महान याग होय. असे हे थोर नाथपंथी सिध्‍द पुरूष श्री देवेंद्रनाथ महाराज वैशाख शुध्द एकादशी (मोहिनी एकादशी) ला सोमवार दि. ३ मे १९८२ रोजी समाधिस्त झाले. सिध्द पुरूष जरी समाधिस्त झाले तरी त्यांचे कार्य निरंजनातून चालूच रहाते. महाराजांच्या सदेही नाथकार्यातील अपूर्ण राहिलेल्या गोष्‍टी आजही ते वेळोवेळी आदेश देऊन आपल्या शिष्यांनी चालू ठेवले असून कळवा, जि. ठाणे, मढी, नगर, चिंचवड, श्रीरामपूर अशा अनेक ठिकाणी श्री देवेंद्रनाथ मठाची स्थापन झाली आहे. श्री देवेंद्रनाथ महाराजांचे गुरू श्री राघवेंद्र स्वामी यांचे वृंदावन मंदिर बोल्हेगाव, नगर येथे स्थापन करून महाराजांची इच्छा त्यांच्या शिष्यगणांनी पूर्ण केली आहे. महाराजांनी स्थापन केलेल्या श्री नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्ट या संस्थेमार्फत या सर्व ठिकाणची व्यवस्था व नाथकार्य चालू आहे. अशा या महान सिध्‍दनाथांच्या समाधीस्थानी मयूरटेकडी, मढी येथे शिवपिंडीच्या आकाराचे श्री देवेंद्रनाथ मंदिर भक्‍तगणांनी बांधले आहे. या शिवपिंडीतील मंदिरात बसून शिवरूप झालेले सद्‍अगुरू श्री देवेंद्रनाथ महाराज आजही आपल्या भक्‍तगणांवर कृपावर्षाव करीत आहेत. अशा या महान विभूतीला आमचे कोटी कोटी प्रणाम ।

 
सिध्‍द श्री देवेंद्रनाथ
नाथ कार्य
श्री नवनाथ पोथीचे पारायण
नवध्यान योग
साधना मार्गाची माहिती
गुरुमंत्र
Copyright 2011 © Aditya Deshmukh. All Rights Reserved. Website designed & developed by Manomay Informatics