Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

 
प. पू. श्री. देवेंद्रनाथ महाराज उर्फ श्री विजयकुमार सखाराम सुळे हे या कलियुगातील एक महान नाथपंथी सिध्‍द योगी होते. साधी रहाणी व उच्च विचारसरणी असलेले देवेंद्रनाथ महाराज हे व्यवसायाने वास्तूविशारद होते.

नाथ कार्य
नवध्यान योग
नवनाथ पोथीचे पारायण
गुरूमंत्र

 
 
 
  गुरुमंत्र:

 

गुरुमंत्र घेणाऱ्यांनी खालील नियम पाळावेत.

१) गुरुमंत्र घेण्याच्या दिवशी सकाळी उठल्यापासून पाणीदेखील न पीता (निर्जली) उपवास करावा.

 

२) गुरुमंत्र घेतल्यावर त्वरित किमान तो १०८ वेळा डोळे मिटून शांत चित्ताने जपावा.

 

३) मंत्रजप झाल्यावर भक्‍तिपूर्वक अंतःकरणातून सद्‍अगुरु श्री देवेंद्रनाथ महाराजाचे दर्शन घेऊन महाप्रसाद ग्रहण करावा.

 

४) गुरुमंत्र मिळाल्यानंतर शुभ दिवस पाहून सलग २१ दिवस सकाळी स्नान करुन किमान १०८ वेळा गुरुमंत्राचा जप सुर्योदयापुर्वी करावा. त्यावेळी गुरुमंत्राच्या वेळी गुरुंनी दिलेली पुडी आपल्या हातात धरावी. त्यामुळे आपल्या शरीरातील किंवा आजूबाजूच्या वातावरणातील कोणत्याही बाह्य शक्‍तीचा आपल्याला त्रास होणार नाही. २१ दिवस पुर्ण झाल्यावर ती पूडी देवघरात ठेवावी.

 

५) २१ दिवस पुर्ण झाल्यानंतर गुरुमंत्र केव्हाही आपल्या वेळेच्या उपलब्धतेनुसार जपला तरी चालतो. पण दिवसातून एकदा तरी जप करणे आवश्यक आहे.

 

६) स्त्रियांनी २१ दिवसाच्या कालावधीत मासिक पाळी आल्यास ते पाच दिवस सोडून मंत्र जप करावा.

 

  ओटी भरणे:

 

संतान प्राप्तीसाठी येणाऱ्या स्त्रियांची ओटी मंदिरात भरली जाते.

 

१) ज्या स्त्रियांना ओटी भरावयाची आहे त्यांनी सकाळी उठल्यापासून पाणीदेखील न पीता आपल्या यजमानांसह मंदिरात येणे जरुरीचे आहे.

 

२) त्या दिवशी उभयतांनी उपवास करावा.

 

३) मंदिरात येताना नारळ (लहान आकाराचा) घेऊन येणे. कारण तो नारळ ओटी भरल्यानंतर त्या स्त्रीनेच खावयाचा असतो.

 

४) ओटी भरल्यानंतर नारळ ओटीमध्ये बांधून मंदिराला ५ प्रदक्षिणा उभयतांनी घालाव्यात.

 

५) प्रदक्षिणा पुर्ण झाल्यानंतर भक्‍तिपूर्वक अंतःकरणाने सद्‍अगुरु श्री देवेंद्रनाथ महाराजांचे दर्शन घेऊन नारळ फक्‍त ओटी भरलेल्या स्त्रीनेच संपूर्ण खावयाचा असतो.

 

६) अपत्यलाभ होईपर्यंत श्री नवनाथ भक्‍तिसार या ग्रंथातील ९ व्या अध्यायाचे नित्य पठण उभयतांपैकी कोणीही एकाने करावे.

 

 
सिध्‍द श्री देवेंद्रनाथ
नाथ कार्य
श्री नवनाथ पोथीचे पारायण
नवध्यान योग
साधना मार्गाची माहिती
गुरुमंत्र
Copyright 2011 © Aditya Deshmukh. All Rights Reserved. Website designed & developed by Manomay Informatics