Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

 
प. पू. श्री. देवेंद्रनाथ महाराज उर्फ श्री विजयकुमार सखाराम सुळे हे या कलियुगातील एक महान नाथपंथी सिध्‍द योगी होते. साधी रहाणी व उच्च विचारसरणी असलेले देवेंद्रनाथ महाराज हे व्यवसायाने वास्तूविशारद होते.

नाथ कार्य
नवध्यान योग
नवनाथ पोथीचे पारायण
गुरूमंत्र

 

संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे गुरुपोर्णिमा, राघवेंद्रस्वामी आराधना उत्सव, धर्मनाथबीज, रंगपंचमी, सदगुरु श्री देवेंद्रनाथ महाराज जयंती उत्सव इत्यादी धार्मिक उत्सव मोठ‍या प्रमाणात साजरे केले जातात. हजारो भाविक नाथभक्‍त गुरुबंधू, दिक्षांतनाथ या सर्व कार्यक्रमास मोठ‍या संख्येने हजर राहून धार्मिक सोहळ्याचा आनंद द्विगुणीत करतात.

  नाथपंथाचा प्रसार व प्रचार दिंडी :

दरवर्षी श्रावण महिन्यात संपुर्ण महिनाभर नाथपंथी प्रसार व प्रचार दिंडी काढ‍ली जाते. त्यामध्ये प्रामुख्याने पीठाधीपती खगेंद्रनाथ महाराज, वीरेंद्रनाथ (जाधव महाराज), धमेंद्रनाथ (आढाव महाराज, चिंचवड) सहभागी असतात.

यावर्षी विशेष म्हणजे पुणे, चिंचवड, या परिसरातील गुरुबंधू व नाथभक्‍तांनी नाथजींनी याच परिसरात दिंडी निमित्त होम-हवन करुन भक्‍तगणांचे भवदुःख दूर करणेबाबतचे काम केले. तसेच सर्वप्रकारची व्यसनमुक्‍ती इत्यादीसाठी प्रवचनातून सत्संगातून भक्‍तांना पीठाधीपतींनी मार्गदर्शन केले.

विशेषतः दीक्षांत नाथ (प्रशांत चिंचोलकर) प्रेमेंद्रनाथ यांनी पुणे येथील गाडगे महाराज धर्मशाळेचा हॉल भाडयाने घेवून सामुदायिक होम-हवन केले. तेथील गुरुबंधु यांनी सभागृहात केलेली सजावट पुजेची मांडणी, व्यासपीठ व महाप्रसादाची व्यवस्था इत्यादी कामांची व्यवस्थीत योजना केली होती. सर्वांनीच आपापली कामे व्यवस्थीतरित्या पार पाड‍ली. यामधुन श्री. प्रशांत चिंचोलकर यांचे मार्गदर्शन अभेद संघटना कौशल्य याचे दर्शन सर्व नाथभक्‍तांना व सर्व दीक्षांत नाथांना दाखवून दिले.

अशा पध्दतीने सर्व गुरुबंधू, नाथभक्‍त व सर्व दीक्षांत नाथांनी एक दिलाने गुरुकार्यास हातभार लावल्यास संस्था अधिकाधिक वृद्धिंगत झाल्याशिवाय राहणार नाही.

  उत्सव व कार्यक्रम:

अ.क्र. कार्यक्रम स्थान
दर्श-अमावास्या मढी
श्रीदत्तजयंती अनुष्‍ठान कळवा
धर्मनाथबीज बोल्हेगांव, कळवा
श्री राघवेन्द्रस्वामी सेवा मंत्रालयम्‌ / बोल्हेगांव
महाशिवरात्र मढी / कळव
रंगपंचमी-श्री चैतन्य कानिफनाथ समाधी दिवस व मढी यात्रा मढी
श्री देवेन्द्रनाथ महाराज जयंती मढी
गुरूमंत्राचे अनुष्‍ठान १६ जून श्री देवेन्द्रनाथ जन्म मढी, कळवा, चिंचवड व पुणे
गुरूपौर्णिमा उत्सव मढी व कळवा
१० श्री राघवेन्द्रस्वामी मध्याराधना उत्सव बोल्हेगांव (नगर)
११ श्रीकृष्ण जन्माष्‍टमी बोल्हेगांव, कळवा
१२ नवरात्र-घटस्थापना कळवा
१३ नवमी हवन व "अलख निरंजन चे प्रकाशन" कळवा

 

 
शाळेची माहिती
संशोधन केंद्र माहिती
वाचनालय
रक्‍तदान शिबीर
आध्यात्मिक कार्यक्रम
Copyright 2011 © Aditya Deshmukh. All Rights Reserved. Website designed & developed by Manomay Informatics